मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

येवला (जि.नाशिक) : सायगाव फाटा येथे काही मोकाट कुत्रे हरणाच्या पाडसाला आपल्या तोंडात घेऊन पळताना दिसून आले. ते पाडस अत्यंत बिथरलेल्या अवस्थेत जखमी झाले होते. पुढे काय घडले वाचा...
 

कुत्र्याच्या तावडीत सापडलेले हे पाडस जखमी झाले होते

शनिवारी (ता. १४) सायंकाळी चारच्या सुमारास तालुक्यातील सायगाव फाटा येथे काही मोकाट कुत्रे हरणाच्या पाडसाला आपल्या तोंडात घेऊन पळताना दिसून आले. कुत्र्याच्या तावडीत सापडलेले हे पाडस जखमी झाले होते. धनाजी कांबळे, पारसनाथ बिडाईत, सचिन आव्हाड, सुमन बिडाईत, नानासाहेब बिडाईत आदींनी या कुत्र्यांना दगडाने मारून पिटाळून लावत पाडसाची सुटका केली. जखमी पाडसाला पाणी पाजत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर येवला वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्याशी संपर्क साधत वन विभागाच्या ताब्यात दिले.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

युवकांनी दिले जीवदान

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाडसाला येवला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर या पाडसाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली. सायगाव येथे कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या दोन महिने वयाच्या हरणाच्या पाडसाची सुटका करत युवकांनी जीवदान दिले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला