मोबाईल हातात आला अन् वाचनाचा नाद झाला पोरका!

नाशिक : आज-काल प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. त्यावरील सोशल मीडियावर बहुतांश जण व्यस्त असतात . मोबाईल हातात आला व जीवनाचा अविभाज्य अंश झाला. त्यामुळे वाचनाचा नाद मात्र पोरका झाला .वाचनीय पुस्तके कादंबऱ्या पडलेल्या दिसतात. 

सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे ग्रंथसंपदा नजरेआड 

विज्ञानाने प्रगती केली व सर्व काही नवनवीन पहायला मिळत असताना ,पूर्वी वाचन करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती .मात्र आता प्रत्येकाकडे आलेल्या अँड्रॉइड मोबाईलमुळे बहुतांश जण त्यातच व्यस्त असलेला दिसतो. वाचनीय पुस्तके, कादंबऱ्या, कवितासंग्रह आदीस जणू मागणीच राहिली नाही .पूर्वी वाचनाची गाठ आवड असलेल्या मंडळीकडून मिळेल तिथून विविध पुस्तके आणली जायची. मात्र मोबाइलमुळे व त्यातील सोशल मीडियामुळे कुणालाही पुस्तकाची गरज राहिली नाही. अगदी वाचनासाठी लागणारी पुस्तके त्यावर मिळू लागले पण, वाचण्यापेक्षा अनेकजण दिवस-रात्र सोशल मीडियावर जसे व्हॉट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम ,ट्विटर, गुगल ,युट्युब आदींवर गुंतलेले दिसून येतात.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

वाचनाचा नाद मात्र पोरका

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण मोबाईलच्या आहारी गेलेला असून,मोबाईल जवळ नसल्यास काहीतरी हरवल्याची भासते.रिकाम्या वेळात आता पुस्तके वाचण्यापेक्षा मोबाईलवर बहुतांश जण गुंतलेले असतात. 
पूर्वी हवी असलेली पुस्तके विकत आणणे किंवा लायब्ररीतून घेतल्या जायचे तर, लायब्ररीत वाचकांची मोठी गर्दी देखील दिसायची परंतु आता लायब्ररीतील गर्दी नाहीशी झाली तर ,पुस्तके विकत आणून किंवा लायब्ररीतून आणून वाचणे इतका वेळही कुणाकडे नसल्याचे निदर्शनास पडते. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

लहान मुलांच्याही अभ्यासासाठी मोबाइलचा वापर

वाचनाने माणूस मोठा होतो, असे पूर्वी म्हणायचे आता मोबाईलने माणूस मोठा होतो की काय? असे वाटू लागले आहे वाचनाचा छंद जोपासणारी मंडळी देखील मोबाईल वरच वाचन करताना दिसते. आता तर कोरोना काळात लहान मुलांच्याही अभ्यासासाठी मोबाइलचा वापर करीत आहेत. अभ्यासापेक्षा गेम वरचे अनेक मुले व्यस्त असतात. मोबाईल प्रत्येक व्यक्तीच्या हातात आल्यापासून वाचनाचा नाद मात्र पोरका झाला. काही वर्षानंतर पुस्तके वाचन या गोष्टीत लोप पावतात की काय? असे वाटू लागले आहे. जेव्हापासून अँड्रॉईड मोबाईल हातात आला, तेव्हापासून वाचनाचा नादच दूर झाला असे सर्वत्र दिसत आहे.