‘मोहब्बत के दिन वतन पर जान लुटा गऐ’; सोशल मीडियाही गहिवरला!

नाशिक : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी तरुणांवर गुलाबाच्या फुलांचा लाल रंग बहरलेला दिसतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी लाल रंगाने सर्वांचे हृदय हेलावून टाकले तो लाल रंग फुलांचा नव्हे, तर शहीद जवानांच्या रक्ताचा होता.

‘मोहब्बत के दिन वतन पर जान लुटा गऐ’ 

‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी तरुणांवर गुलाबाच्या फुलांचा लाल रंग बहरलेला दिसतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी लाल रंगाने सर्वांचे हृदय हेलावून टाकले तो लाल रंग फुलांचा नव्हे, तर शहीद जवानांच्या रक्ताचा होता. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले होते. रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता. एकमेकांत प्रेम वाटण्याच्या दिवशी असा भ्याड हल्ला झाल्याने सर्वांचे मने हेलावून गेली. शिवाय सर्वत्र संतापाची लाट पसरली होती. या घटनेस दोन वर्ष झाले आहे. यानिमित्त अनेकांनी शहिदांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच शहिदांना आदरांजली देणारे संदेश सोशल मीडियावर टाकले.

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

पुलवामा घटनेतील शहिदांना सोशल मीडियातून आदरांजली 

अंगावर शहारे आणणारे घटनेतील काही प्रसंगही अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने शहीद जवांना आदरांजली वाहण्यात आली. ‘वतन से मोहब्बत इस कदर निभा गऐ, मोहब्बत के दिन वतन पर जान लुटा गऐ’, अशा विविध प्रकारचे आदरांजलीपर भावनिक संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. एवढेच नव्हे, तर काहींनी त्यांचे स्टेटसही शहीद जवानांना आदरांजली वाहणाऱ्या संदेशाचे ठेवले. अशा प्रकारचे संदेश आणि स्टेटसमुळे जणू सोशल मीडियाही गहिवरला, असे जाणवत होते.  रविवारी एकीकडे प्रेमाचे प्रतीक असलेला ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा होत असताना, दुसरीकडे पुलवामा घटनेतील शहिदांना आदरांजली वाहणाऱ्या विविध संदेशाने सोशल मीडिया गहिवरला होता. अनेकांनी त्यांचे व्हॉट्सॲप स्टेटस शहिदांना आदरांजली देणारे ठेवले होते. 

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.