मौजमजेसाठी घरातून पळून येणे भोवले! तीन अल्पवयीन मुलांना घडली अद्दल

नाशिक रोड : गीतांजली एक्स्प्रेसमधून कोलकत्याहून मुंबईला जाण्यासाठी नागपूरची तीन अल्पवयीन मुले बसली. ती पळून जात असल्याचे कुटुंबीयांनाह धक्का बसला.. पण हीच मौजमजा तिघांना चांगलीच भोवली आहे. काय घडले वाचा....

रेल्वेत बसली तीन अल्पवयीन मुलं

सहाय्यक रेल्वे पोलिस निरीक्षक विष्णू भोये यांनी दिलेल्या माहितीनुसार गीतांजली एक्स्प्रेसमधून कोलकत्याहून मुंबईला जाण्यासाठी नागपूरची तीन अल्पवयीन मुले बसली. ती पळून जात असल्याचे कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी तातडीने नागपूर पोलिसांशी संपर्क साधला. मुलांच्या मोबाईल ट्रेसिंगवरून ती गीतांजली एक्स्प्रेसमध्ये असल्याचे समजले. नागपूर आणि भुसावळच्या रेल्वे पोलिसांनी तातडीने नाशिक रोड रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाला माहिती दिली आणि मुलांचे छायाचित्र व्हॉट्सॲपवर पाठवले. गाडी नाशिक रोडला आल्यावर पोलिसांनी गाडी तपासली. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

मुलांच्या सुरक्षेसाठी बालसुधारगृहात रवानगी
या वेळी कोच एस-४ मध्ये ते आढळले. त्यांना उतरवून चौकशी केली असता घरातून पळून जात असल्याचे त्यांनी कबूल केले. ही मुले सोळा वर्षांची आहेत. नागपूरच्या प्रतापनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांना व मुलांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले.  नागपूरहून मुंबईला मौजमजा करण्यासाठी रेल्वेतून पळून जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना नाशिक रोड रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी