…म्हणून त्यांनी जाळल्या चायनीज गाड्या; दोघे संशयित अटकेत

म्हसरूळ (नाशिक) : येथील गांधी तलावाशेजारी ठेवलेल्या बोटी जाळण्याचा प्रकार घडलेला असताना गोदाघाटावरील गांधी तलाव येथे गाडगे महाराज पुलाजवळ चायनीजचे तीन हातगाडे पेटवून दिल्याची घटना  गुरुवारी (ता. २५) मध्यरात्री घडली होती. या घटनेमुळे गोदाघाटावरील गुन्हेगारीचा विळखा पुन्हा घट्ट होतो की काय, अशी भीती व्यक्त होत असतानाच पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे.

काही तासांतच आवळल्या मुसक्या

पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत शिर्डी येथून दोघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, यातील अन्य एकजण फरारी झाला आहे. पोलिसांनी शुभम ऊर्फ शंभू गोरख जाधव (वय २३, रा. म्हसरूळ टेक, जुने नाशिक) व दर्शन ऊर्फ ओमकार रवींद्र सूर्यवंशी (वय २२, रा. गोवर्धने वाडा, जुने नाशिक) असे संशयितांची नावे आहेत. त्यांना पंचवटी पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

हे सगळं तीनशे रुपयांसाठी

संशयितांनी चायनीज हातगाडे चालविणाऱ्या व्यावसायिकांना दररोज ३०० रुपये खंडणी मागितली. यावर या विक्रेत्यांनी नकार दिल्याने संशयितांनी त्याच दिवशी रात्री बाराच्या सुमारास तीन चायनीज हातगाड्यांवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्या. तिन्ही चायनीज हातगाडे व इतर साहित्य जाळून खाक झाल्याने विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, या गुन्ह्याची उकल झाल्याने शनिवारी (ता. २७) सायंकाळी पंचवटी पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव, पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, तपासी पथकातील सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, विलास चारोस्कर, कुणाल पचलोरे, राकेश शिंदे, गोरख साबळे, अविनाश थेटे, अंबादास केदार, किरण सानप, नितीन जगताप उपस्थित होते.

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ