…म्हणून शेतकऱ्याने कोथिंबीरच्या शेतात सोडली जनावरे 

मुखेड (नाशिक)  : रात्रंदिवस कष्ट करुन पिकाला जपलं,  पैसा खर्च केला आणि कोथींबीर लागवड केली. पण दरच मिळाला नाही त्यामुळं शेतकऱ्याच्या  कष्टाचा मोबदला जाऊ दया पण वर त्यालाच भुर्दंड भारण्याची वेळ आली आहे.

 चारा म्हणूनही कोणी नेईना

देशमाने (ता. येवला) येथील शेतकरी शरद किसन गोरे यांनी चांगल्या भावेच्या अपेक्षाने आपल्या शेतातील ३० गुंठे क्षेत्रात कोथिंबीरची लागवड केली. परंतु सध्या कोथिंबीरला भावच नसल्याने त्यांना २० हजार रुपये आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. यातच कोथिंबीर मातीमोल भावाने विकण्यापेक्षा चारा म्हणून पाहिजे असेल तर उपटून न्यावे, असे आवाहन केले. मात्र कुणीही न आल्याने गोरे यांनी कोथिंबीरच्या क्षेत्रात म्हशी सोडून दिल्या. सध्या भाजीपाल्यास भाव नसल्याने केलेला खर्चही निघत नसल्याने शेतात कोणते पीक घ्यावे, हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडत आहे. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या