म्हातारे आईबाप, पत्नी-लेकरांना सोडून जीवनातून झाला मुक्त; शेतकरी हतबल

मालेगाव (जि.नाशिक) : अशा कोणत्या परिस्थितीने शेतकरी हतबल झाला कि त्याला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. अगोदरच सततच्या नापिकीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असतानाच असे काही घडले ज्याने शेतकऱ्याला जगातून मुक्त व्हावेसे वाटले. 

गेल्या चार वर्षांपासून त्यात उत्पन्नच नाही

टिंगरी (ता. मालेगाव) येथील भारत आनंदा सोनवणे (वय ४४) या यांच्याकडे दोन एकर जमीन आहे. मात्र, दुष्काळ व नंतरची अतिवृष्टी यामुळे गेल्या चार वर्षांपासून त्यात उत्पन्न येत नव्हते. त्यातच शेतमालाला भाव न मिळाल्याने ते तणावात होते, गावालगत असलेल्या आपल्याच शेतात विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. त्यांचे बंधू गुलाब सोनवणे यांनी त्यांना तातडीने येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉ. अंकिता पवार यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. असे कुटुंबीयांनी सांगितले.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी

त्यांच्यावर नेमके किती कर्ज होते हे समजू शकले नाही. मात्र, खासगी देणे असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. शासनाने सोनवणे कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव यांनी केली.  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO