म्हैसवळण घाटात भीषण अपघात; मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला 

सिन्नर (जि.नाशिक) : इगतपुरी व अकोले तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या म्हैसवळण घाटात गुरुवारी (ता.1) सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणारा टेंपो खोल दरीत कोसळला.अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.

मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो म्हैसवळण घाटात कोसळला 

अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. नाशिक येथून बांधकाम मजूर अकोले तालुक्यात कामासाठी गेले होते. त्यांना घेऊन परतत असताना सायंकाळी घाटातील संरक्षक भिंतीला धडक देऊन टेम्पो क्र. एमएच 04 इजी 8378  खोल दरीत कोसळला. हा अपघात झाल्यावर तेथून जाणारे इगतपुरी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी यांनी पोलीस व स्थानिक रहिवाशांना अपघाताची माहिती दिली.  

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

एका बांधकाम मजुराचा मृत्यू; टेम्पो चालकासह 18 जण जखमी

घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, संजय कवडे , हवालदार शीतल गायकवाड, संतोष दोंदे यांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात हलवले. हा अपघात राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असल्याने त्याबाबत तेथील पोलिसांना सूचित करण्यात आले. या टेम्पो पंधरा पुरुष, तीन महिला व एक लहान मुलगा प्रवास करत होता. उपचारादरम्यान एका पुरूषाचा मृत्यू झाला असून टेम्पो चालकासह चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती घोटी पोलिस ठाण्यातील सूत्रांनी दिली. या अपघातात एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. तर 18 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता