“यशस्वी होण्यासाठी जिद्दीबरोबरच अभ्यासाची गरज” – डॉ. प्रताप दिघावकर

मालेगाव (जि. नाशिक) : शासकीय अधिकारी होण्यासाठी पैसा लागत नाही. जिद्द, कठोर मेहनत व अभ्यासात सातत्य राहिल्यास यश आपोआप मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा आता उपलब्ध झाल्या आहेत. या सुविधांचा योग्य पद्धतीने वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी होत माळमाथ्यासह आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी व्यक्त केले. 

ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचीही तयारी

डॉ. दिघावकर म्हणाले, की शेतकरी कुटुंबातील मुलेही उच्च पदस्य अधिकारी होत आहेत. कोरडवाहू, माळरान जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी निश्‍चित ध्येय ठेवून शैक्षणिक वाटचाल करावी. शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली पाहिजे. मेहनतीच्या बळावर सामान्य कुटुंबातील शेकडो विद्यार्थी शासकीय अधिकारी झाले आहेत. नियमित व प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे. यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका. स्पर्धा परीक्षांसंदर्भात काही अडचण असेल तर ग्रामीण विद्यार्थ्यांना आपली मार्गदर्शनाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले. भारताचे भावी आधारस्तंभ तयार करताना शिक्षकांनी स्वतःला झोकून देत विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन आमदार दराडे यांनी केले. डॉ. दिघावकर यांच्या हस्ते निवृत्त मुख्याध्यापक देवरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अस्ताने व माळमाथ्यावरील ग्रामस्थांतर्फे डॉ. दिघावकर यांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला.  

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

 अस्ताने येथील बी. एम. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक मदानसिंग देवरे यांच्या सेवापूर्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार सुधीर तांबे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार किशोर दराडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार, ॲडव्होकेट शिशिर हिरे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक शशिकांत शिंदे, डॉ. जयंत पवार, दिलीप पगार, अभिजित पाटील आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार