Site icon

यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आपले सण-उत्सव हे संकटांना तोंड देण्याची शिकवण देतात. यश फाउंडेशनमुळे आजवर अनेकांचे जीवन सुखमय झाले आहे. तुमचे जीवनही दिवाळीच्या प्रकाशाप्रमाणे आरोग्यदायी होईल, असा विश्वास नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या बालकांना दिला.

यश फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या मुलांसाठी आयोजित दिवाळी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वंजारी, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते 124 एचआयव्हीग्रस्त बालगोपाळांना फराळ, मिठाई वाटप करण्यात आले. यश फाउंडेशन एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या बालकांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी यावेळी जिल्ह्यातील 250 बालगोपाळ व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला.

बालगोपाळांची दिवाळी लखलखत्या दिव्यांप्रमाणे प्रकाशमय व्हावी, या उद्देशाने दरवर्षी यश फाउंडेशन हा उपक्रम राबवते. एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या बालकांच्या चेहर्‍यावरील हसू, समाधान हे मनाला समाधान देऊ जाते. -रवींद्र पाटील, अध्यक्ष, यश फाउंडेशन, नाशिक.

हेही वाचा:

The post यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू appeared first on पुढारी.

Exit mobile version