युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे – संजय राऊत

नाशिक : शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवल्यास यूपीए मजबूत होईल, यूपीएचे नेतृत्व बदलून ज्या नेत्याला विरोधक स्वीकारतील अशा नेत्याच्या हाती द्यावे असे सूचवताना या आघाडीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना द्यावे, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.संजय राऊत नाशिक दौऱ्यावर शनिवार (ता.२०) असून शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.त्यावेळी ते बोलत होते

जळगाव पॅटर्नच्या निमित्ताने दाखविलं

गर्जनाच करीत नाही. तर आम्ही करुनही दाखवितो. हे जळगाव पॅटर्नच्या निमित्ताने दाखविलं. गर्जना प्रत्यक्ष उतरविल्या म्हणून गिरीष महाजनची जळगावला सत्ता घालविली. अशी टिका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी गिरीष महाजन व भाजपवर केली. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

स्मार्ट सिटीच्या नावाने महापालिकेत दरोडे

स्मार्ट सिटीच्या नावाने महापालिकेत दरोडे पडत असून त्यााची माहीती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांच्यापर्यत पोहोचविणार आहे. नाशिक महापालिका निवडणूक तयारीसाठी सहा सदस्यीय समिती असेल महापौर शिवसेनेचाच  असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा
   
युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे

देशात युपीएचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्यास युपीए आणखी बळकट होईल. नाशिकला जळगाव पॅटर्न नाशिकला राबवायचा होता पण आता निवडणूकीत वाजत गाजत लोकशाही पध्दतीने महापौर करु. जळगावला घोडेबाजार झाला असेल तर मग पहाटे मुख्यमंत्री निवडीवेळी कोणता बाजार होता? असा सवाल त्यांनी केला आहे.