शिंदवड (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – कुठे फिरायला जायचे नियोजन करत असाल तर रेल्वे, विमान, बस किंवा चारचाकी वाहनाचे नियोजन केले जाते. तर काही पर्यटक सायकल किंवा पायी देखील जायचे स्वप्न बघतात. परंतु नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तिसगावचा अक्षय सुरेश इखे हा तरुण शेतकरी चक्क ट्रॅक्टरवरुन नाशिकवरून लद्दाखला जायला निघाला आहे.
दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे शेतात काम करणारा युवक चक्क ट्रॅक्टर घेऊन लद्दाखला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघाला आहे. तिसगाव ते लद्दाख हा २१५० किमीचा प्रवास तो आपल्या ट्रॅक्टरवरुन लद्दाखच्या बर्फाळ पर्वतीय राशी, या पर्वतातून खळखळणाऱ्या नद्या पाहण्यासाठी त्याने हे आयोजन केले आहे. येथेील विविध पर्यटन स्थळे तो बघणार आहे. अक्षय इखे चा छंद म्हणजे तो अनेक दिवसांपासून इन्टांग्रामवर रिल्स बनवत आहे. उदरनिर्वाहासाठी तो द्राक्ष, टोमॅटो, कांदा आदी पिकांची शेती देखील करत आहे. शेती करत असताना काहीतरी नविन करायचे स्वप्न तो बघत होता. त्याचवेळी त्याने ठरवले की, महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात ट्रॅक्टरने कुठे तरी दुर फिरायला जायचे आणि त्याचवेळी त्याच्या दृढनिश्चय केला की, आपला शेतातील जवळचा मित्र म्हणजे ट्रॅक्टर घेवूनच अक्षय लद्दाखला आज शनिवार (दि.२२) राेजी निघाला आहे. अक्षयचा हा प्रवास प्रथमच इतक्या दूर ट्रॅक्टरने होत असून त्याला गावातील सर्वांनी सुखाचा व आनंदी प्रवास होवो! अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा: