“येत्या 15 दिवसात कोरोना नियंत्रणात आणणारा रिझल्ट दाखवा!”

नाशिक : येत्या 15 दिवसात कोरोना नियंत्रणात आणता येतील असे रिझल्ट दाखवा असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

लॉकडाऊन हा कोरोनावर उपाय नाही

भुजबळ म्हणाले, नियंत्रण करण्यासाठी प्रशासकीय क्षमता आहे. पण मध्यंतरी त्यात शिथिलता आली. मात्र आता पुन्हा एकदा सगळ्यांनी एकत्र येऊन कोरोना विरोधात एकजुटीने तयारी सुरू करावी. लॉकडाऊन हा कोरोनावर उपाय नाही सगळ्या विभागांनी एकत्र करून प्रतिबंधात्मक उपाय कडक आणि गतिमान करावेत, कोणताही अनुभव नसताना मालेगाव नियंत्रणात आणले. आता बऱ्यापैकी अनुभव असताना निष्काळजीपणा होऊ नये. लहान घरातील क्वारंटाईन रुग्णांकडे लक्ष ठेवा आणि उगाच मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाया करा. असे निर्देश भुजबळांनी दिले.

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाया करा.

होम क्वारंटाइन रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने 30 पथकं करावीत. ज्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी राहण्याची सोय नाही. अशा रुग्णासाठी महापालिकेने सोय करावी. येत्या रविवारी ऑक्सिजन टाकी कार्यान्वित होईल नियम न पाळणाऱ्यावर पोलीस कडक कारवाई करतील. शिथिलीकरणाचे नियम न पाळल्यास कोरोना संपेपर्यंत दुकान बंद ठेवणार

कोरोना संपेपर्यंत दुकान बंद ठेवणार

यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडे,जि प मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपअधीक्षक शनिष्ठ वालावलकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा