येवल्यात कांदा दरात घसरण; देशांतर्गत बाजारपेठेत कांदा आवक वाढली

येवला (जि.नाशिक) : गेल्या सप्ताहपासून रांगडा लाल कांदा बाजारभावात दिवसागणिक वाढ होत असताना गुरुवारी (ता.४) मात्र येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात सरासरी ४०० रुपयांची घसरण झाली. 

बाजार भावाकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा

देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत कांदा आवक वाढल्याने कांदा बाजारभावात घसरण झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांदा किमान, कमाल व सरासरी बाजारभावात घसरण झाली. येवला बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात बुधवारी (ता.३) लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ११०० ते कमाल ३६२५ (सरासरी ३२५०) रुपये बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे गुरुवारच्या बाजार भावाकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

लाल कांद्यास असा बाजारभाव

गुरुवारी येवल्यात ८५० रिक्षा पिक-अपमधून सुमारे सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान एक हजार ते कमाल तीन हजार ३५१ (सरासरी दोन हजार ८५०) रुपये असा बाजारभाव मिळाला.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच