येवल्यात मराठा समाज आक्रमक; मंत्री भुजबळ यांचे फोटो कार्यालयातून बाहेर

  • Post author:
  • Post category:Uncategorized

येवला; पुढारी वृत्तसेवा : मंत्रिमंडळातील बैठकीत मराठ्यांना ओबीसीतून प्रमाणपत्र देण्याला भुजबळांच्या विरोधानंतर येवल्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. विविध कार्यालयातील भुजबळांच्या प्रतिमा हटवल्या गेल्या तर भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मंगळवार (दि. 31) मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.  बीडमधील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या उद्रेकाचे नाशिक जिल्ह्यात देखील पडसाद उमटताना दिसत आहेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघांमध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, जगदंबा माता देवस्थान कोटमगाव, अंदरसुल ग्रामपंचायत व अधिक विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमा काढून त्यावर शाई फेकून निषेध करण्यात आला. यापैकी पंचायत समिती कार्यालयातील प्रतिमेवर महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा असल्यामुळे ठिकाणी सदरची प्रतिमा सन्मानपूर्वक काढून त्या ठिकाणी स्वतंत्र महात्मा फुले यांची प्रतिमा देखील बसवण्यात आली. या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व काढलेल्या प्रतिमांवर शाई फेक करून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान भुजबळांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या मराठा समाजातील नेत्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. गावातील लोक पुढाऱ्यांना गाव बंदी आणि निषेध करा म्हणत आहेत. हे नेते कोणतेही उत्तर न देता गप्प बसले आहेत. तर ग्रामपंचायतीचा गाव बंदीचा आणि निषेदाचा ठराव मंजूर होऊन देत नसल्याने विखरणी गावातील ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचे ठरवले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गावोगाव मराठ्यांच्या समर्थनार्थ गाव बंदी व इतर ठराव केले जात असताना केवळ लाचारीमुळे समाजातील भुजबळ समर्थकांकडून गावाचे नाव खराब होत असल्याची प्रतिक्रिया या गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शेलार यांनी दिली आहे.

The post येवल्यात मराठा समाज आक्रमक; मंत्री भुजबळ यांचे फोटो कार्यालयातून बाहेर appeared first on पुढारी.