येवल्यात मोटारसायलकल चोरणारी टोळी जेरबंद; नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई 

येवला (नाशिक) : शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असताना नागरिकांमधून येवला शहर व मालेगाव येथून दुचाकी चोरणाऱ्यांना पोलिसांनी शिताफीने पकडले असून त्यांच्याकडून सहा दुचाकी ताब्यात घेतल्या, नाशिक ग्रामीण पोलिस पथकाने ही कारवाई केली.

चारच दिवसात दुसरी टोळी

येवला शहर व मालेगाव कॅम्प हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या संशयिताची गुप्त माहिती पोलिस पथकाला मिळाली होती.  चार दिवसांपूर्वी २० दुचाकींसह जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्यांच्या टोळीला ग्रामीण पोलिस पथकाने पकडले होते. मोटारसायकल चोरांना अटक करण्याची घटना ताजी असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एका मोटारसायकल चोरीच्या टोळीला पकडले.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

सापळा रचून घेतले ताब्यात 

त्यानुसार मनमाड परिसरातून राजू पंडित अहिरे (२७, रा. आंबेडकर चौक) तसेच येवला शहरातून नावजीश अकील शेख (२१, रा. मोमीनपुरा) यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील या मोटारसायकलींबाबत विचारपूस केली असता त्यांनी शहर व मालेगाव कॅम्प येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. संशयितांच्या ताब्यातून एक लाख सहा हजारांच्या चोरीच्या सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, इम्रान पटेल यांच्या पथकाने सलग दुसऱ्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच