येवल्यात लाल कांदा भाव काहीसा खाली; आवक वाढल्याचा परिणाम बाजारभावावर

येवला (जि.नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ३) मंगळवारच्या तुलनेत लाल कांद्याचे बाजारभाव काहीसे खाली आले. कांदा आवक वाढल्याचा परिमाण कांदा बाजारभावावर झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

लाल कांद्याचे बाजारभाव काहीसे खाली
बुधवारी येवला मुख्य बाजार आवारात ५०० ट्रॅक्टरमधून सुमारे ११ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. येथे लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ७५० ते कमाल २५७१ (सरासरी २,२५०) रुपये असा बाजारभाव मिळाला. अंदरसूल उपबाजार आवारात बुधवारी (ता. ३) २०१ ट्रॅक्टर व १३० रिक्षा पिक-अपमधून सुमारे चार हजार क्विंटल लाल कांदा आवक झाली. येथे प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल २५२५ (सरासरी २३००) रुपये असा बाजारभाव मिळाला. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

१०० ते १५० रुपयांनी घसरण
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात मंगळवारी (ता. २) लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल २७१६ (सरासरी २,४००) रुपये असा बाजारभाव मिळाला होता. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी लाल कांद्याच्या कमाल दरात १४५ रुपयांनी, तर सरासरी दरात १०० ते १५० रुपयांनी घसरण झाल्याचे चित्र दिसून आले.  

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा