येवल्यात लाल व उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक; बाजारभावातही काहीशी सुधारणा

येवला (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.१२) कांद्याची विक्रमी ४५ हजार क्विंटल आवक झाली. बाजारभावात गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या तुलनेत काहीशी सुधारणा झाली. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात सोमवारी १ हजार ट्रॅक्टरमधून सुमारे ३२ हजार क्विंटल लाल व उन्हाळ कांद्याची आवक झाली. या ठिकाणी लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ९१९ (सरासरी ७५०) रुपये तर उन्हाळ कांद्यास किमान ३०० ते कमाल १०५० (सरासरी ९००) रुपये असा बाजारभाव मिळाला. अंदरसूल उपबाजार आवारात ४५० ट्रॅक्टरमधून सुमारे १३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. येथे लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान २०० ते कमाल ८६० (सरासरी ७५०) रुपये तर उन्हाळ कांद्यास किमान २०० ते कमाल ९५० (सरासरी ८००) रुपये बाजारभाव मिळाला.  

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात