नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील ३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या रस्ते, पुलांच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येवला मतदारसंघातील रस्त्यांना आणि पुलांची अनेक कामे मार्गी लागणार असून, नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
येवला मतदारसंघात काही रस्त्यांची व पुलांची दुरवस्था झाल्याने या रस्त्यांची व पुलांची सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी त्यांनी पुरवणी अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार येवला तालुक्यातील अनकाई-कुसमाडी-नगरसूल-अंदरसूल ते पिंपळगाव जलाल रस्त्याची सुधारणा करण्यासाठी साडेतीन कोटी, वापी-पेठ-नाशिक-निफाड-येवला-वैजापूर-औरंगाबाद-जालना रस्ता प्रमुख राज्य मार्ग २ या रस्त्यासाठी २ कोटी ९० लाख, येवला-नागडे-धामणगाव-धोमोडे-बिलोनी ते ७५२ जी रस्त्यावर मध्ये संरक्षण भिंत बांधण्यासाठी साडेतीन कोटी, नगर जिल्हा हद्द पढेगाव अंदरसूल-न्याहारखेडा-रेंडाळे-ममदापूर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ७७ चे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
येवला तालुक्यातील विखरणी-कानडी-पाटोदा-दहेगाव-जऊळके-मुखेड फाटा-सत्येगाव ते धामोरी प्रमुख जिल्हा मार्ग १९५ रुंदीकरणासह मजबुतीकरणासाठी अडीच कोटी, गोपाळवाडी-अनकुटे धामोडे राज्य महामार्ग २५ ते मातुलठाण-सायगाव-अंगुलगाव ते प्रमुख जिल्हा मार्ग ७८ प्रमुख जिल्हा मार्ग १५९ रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी तीन कोटी, येवला-पारेगाव-निमगावमढ-महालखेडा-भिंगारे-पुरणगाव ते प्रमुख राज्य मार्ग २ रस्ता रुंदीकरण करण्यासह मजबुतीकरण करण्यासाठी दोन कोटी, पाटोदा-सातारे-एरंडगाव-रवंदा रस्त्याच्या सुधारणेसाठी साडेतीन कोटी, मनमाड-इकवाई-मोहेगाव-भालूर-लोहशिंगवे-राजापूर-ममदापूर-खरवंडी-कोळम-भारम जिल्हा मार्ग रस्त्यासाठी दीड कोटी, अनकाई-नायगव्हाण-पिंपळखुटे-राजापूर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ७० वर पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ४६ लाख, तर अनकुटे मातुलठाण तळवाडे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १५९ वर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
निफाड तालुक्यातील लासलगाव पाटोदा रस्ता रुंदीकरणासाठी ४ कोटी, पाचोरे मऱ्हळगोई विंचूर रस्ता सुधारणेसाठी ९० लाख, देवगाव ते देवगाव फाटा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १२६ वर स्लॅबड्रेनचे बांधकाम करण्यासाठी ९० लाख, ब्राह्मणगाव वनस ते वनसगाव एमडीआरवर मोठा पूल बांधण्यासाठी ३ कोटी ८२ लाख रुपयांच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पामध्ये समावेश झाला आहे.
मंडल अधिकारी कार्यालयासाठी ४५ लाख
येवला मतदारसंघातील लासलगाव, विंचूर व देवगाव येथील मंडल अधिकारी कार्यालय व निवासस्थान बांधकाम करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पातून ४५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- ‘शुभमन गिलला प्रमाणापेक्षा जास्त संधी’
- Ganeshotsav 2023 : यंदा १९ दिवस उशिराने गणपती बाप्पांचे आगमन
- Sharad Pawar-Ajit Pawar meet : काका-पुतण्या भेटीने संभ्रम
The post येवल्यासाठी भुजबळांकडून गिफ्ट, ३६ कोटींच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश appeared first on पुढारी.