“योगीजी फक्त शहरांची नाव बदलण्यात मश्गुल; महिला व युवतींवरील वाढत्या अत्याचारांचं काय?”

नाशिक : उत्तर प्रदेश राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आली. उत्तरप्रदेशमध्ये महिला व युवतींवर होणारे अत्याचारांचे प्रमाण वाढत असून आपल्या देशातील सर्वात मोठ्या राज्याची कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंतेची बाब बनली आहे. 

कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंतेची बाब

उत्तर प्रदेशात घडणाऱ्या घटनांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट हे अजिबात गांभीर्याने घेत नाहीत, त्यामुळेच त्यांचे योगी आदित्यनाथ हे नाव न वापरता त्यांचे मूळ नावाने त्यांना पत्रे दिले आहेत, योगी हा शब्द अतिशय समजतेचा व जबाबदारीचा असलेकारणाने अश्या गंभीर स्वरूपाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अजय बिष्ट हे असक्षम ठरत आहेत. त्यामुळे त्यांचा योगी म्हणून उल्लेख करण्यास आम्ही टाळत आहोत.  ते फक्त शहरांची नाव बदलण्यात मश्गुल झालेले असून उत्तर प्रदेश सारख्या राज्यात  लहान मुली, युवती, अंगणवाडी च्या ५० वर्षीय महिलादेखील सुरक्षित नाहीत, त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. असे मनोगत बलकवडे हयंनी ह्यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

पंतप्रधान व देशाचे गृहमंत्री गंभीर नाही

देशातील एका मोठ्या राज्यात होणाऱ्या अश्या घटना या देशाचा नाव शरमेन खाली करणाऱ्या आहेत, ह्यावर आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान व देशाचे गृहमंत्री गंभीर नाही आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अश्या गंभीर स्वरूपाच्या प्रश्नांवर लक्ष न घातलं हि निश्चितच देशातील महिलांसाठी काळजी करण्याची बाब आहे. ह्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या वतीने नाशिक मुख्य टपाल कार्यालय बाहेर जमून निदर्शने करण्यात आली. तसेच त्याच मुद्द्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट ह्यांचे नावे पत्रे लिहून त्यांना पोष्टाद्वारे पाठविण्यात आली.

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

अश्या महिला आयोगाच्या सदस्या देशासाठी कलंक

राष्ट्रीय महिला आयोगच्या सदस्या "चंद्रमुखी देवी" यांच्या वक्तव्याचा देखील महिलांनी निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले.बदायुं रेप हत्या प्रकरणात  बेजबाबदारपणाने वक्तव्य करणाऱ्या सदस्याला महिलांच्या अधिकार व सुरक्षे विषयी काहीच ज्ञान नाही. या बेशरम महिलेने आपली निष्क्रियता आणि अज्ञानता दाखवली आहे, अश्या मूर्ख महिला राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणुन काम करतात ही ह्या देशातील लज्जास्पद गोष्ट आहे. हे असले संस्कार देशावर राज्य करतात व अश्या विचारांची महिला हि महिलांच्या सुरक्षेसाठी व न्याय हक्कासाठी बनलेल्या आयोगाच्या सदस्य म्हणून काम करतात. ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि अश्या महिला आयोगाच्या सदस्या देशासाठी कलंक आहेत. असेहि वक्तव्य प्रेरणा बलकवडे यांनी याप्रसंगी केले.

या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सायरा शेख,नीलिमा काळे, पुष्पलता उदावंत सुवर्णा दोंदे, संध्या भगत, मेघा दराडे, वर्षा लिंगायत,सरला गायकवाड, गायत्री झांजरे, आफरीन सय्यद, रुबीना सय्यद, कल्पना रामराजे, आयशा शेख,चंद्रभागा केदारे आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या