रन फॉर युनिटी : तीनशे तरुण-तरुणींची एकता दौड

SOU www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय एकता दिन, भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व पोलिस सप्ताह दिनानिमित्त तहसील कार्यालय व सिन्नर पोलिस ठाणे आयोजित 5 किमी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे 300 युवक-युवतींनी सहभाग घेतला होता.

तहसीलदार प्रशांत पाटील, निवासी तहसीलदार सागर मुंदडा, संजय धनगर, सेवानिवृत्त तहसीलदार दत्ता वायचळे, सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. आर. मुटकुळे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. सकाळपासूनच स्पर्धक उत्साहात कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. यावेळी भगवान काकडे, सागर वाघमारे, निवृत्ती बर्वे, अकबर तांबोळी, रतिलाल सोनवणे, प्रफुल्ल नंदन, अंकुश दराडे, राहुल निरगुडे, समाधान बोराडे उपस्थित होते. परफेक्ट करिअर अकॅडमीचे संचालक शंतनू सोनवणे, ईश्वर गाडे, अकॅडमीमधील युवक व युवती प्रशिक्षणार्थी, नवजीवन शाळेचे प्राचार्य बाळासाहेब पाटील, शरद शिंदे, योगिता भाटजिरे व विद्यार्थी, शहरातील युवक उपस्थित होते व सर्वांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

शेख मोहंमद रजा प्रथम…
या स्पर्धेत युवकांमध्ये प्रथम क्रमांक शेख मोहंमद रजा (सिन्नर), नितीन वारुंगसे (परफेक्ट करिअर अकॅडमी), नवनाथ रेवगडे (ज्ञानदा अकॅडमी), युवतींमध्ये प्रथम क्रमांक मोहिनी हौळ (परफेक्ट करिअर अकॅडमी), प्रतीक्षा चव्हाण (परफेक्ट करिअर अकॅडमी), दिव्या नळे (नवजीवन स्कूल) यांनी पटकावला. या सर्वांचे अभिनंदन करून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा:

The post रन फॉर युनिटी : तीनशे तरुण-तरुणींची एकता दौड appeared first on पुढारी.