रस्त्याच्या दुरवस्थेमुळे Mumbai-Nashik Expressway LTD कंपनीला तब्बल 1 कोटी 8 लाखांचा दंड ठोठावला

<p>मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आता रस्ता बांधणाऱ्या कंपनीला तब्बल 1 कोटी 8 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. मागील महिन्याभरापासून मुंबई ते कल्याण, भिवंडी आणि नाशिकच्या प्रवाशांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरं जावं लागलं. एबीपी माझानं ही या रस्त्याची दुर्दशा आणि प्रवाशांचा खोळंबा वेळोवेळी मांडला. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मुंबई-नाशिक एक्स्प्रेसवे लिमिटेड या कंपनीला 1 कोटी 8 लाखांचा दंड ठोठावला आहे.&nbsp;</p>