रस्त्यावर सोने सापडताच उजळले भाग्य! अखेर लालूचपणावर इमानदारीची जीत

नाशिक : रस्त्यावर चालताना आजकाल कुठल्याच गोष्टीचा भरवसा राहिलेला नाही, दररोज कितीतरी भयानक गुन्हेगारी घटना घडत असतात. दरम्यान या आजच्या गतिमान सगळ्या काळात देखील काही लोक मात्र त्यांचा चांगुलपणा सोडत नाहीत. इतरांना मदत करण्याच्या अविश्वसणीय घटन देखील नेहमीच समोर येत असतात. येथे इंदिरानगर भागात अशीच एक घटना समोर आली आहे. 

घडलेला प्रकार असा की, सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारस पाथर्डी परिसरातील आनंदनगर येथील पोलिस चोकीसमोरुन जात असताना  अनिल आहेर व निलेश परीट या दोघांना रस्त्यावर बेवारस स्थितीत सोन्याची अंगठी व सोन साखळी पडलेली दिसली. त्या दोघांनी दागीन्यांविषयी परिसरात विचापूस केली पण कोणीही समोर आले नाही.  सुमारे ७६ हजार किमतीचे हे दागीने इतर कोणाला सापडले असते तर तो त्याने ते  स्वतःच्या घश्यात घातले असते. मात्र या दोघांनी प्रामाणिकपणा दाखवत थेट इंदिरानगर पोलिस स्टेशन गाठले आणि सर्व हकिकत पोलिसांना सांगितली.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

त्यानंतर स्थानिक रहिवासी दिनेश देसले यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये कोणीतरी सोन्याची अंगठी व साखळी जमा केल्याची माहिती समजली त्यांनी लगेच पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत दागीने आपले असल्याचे सांगीतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी चौकशी करत माहितीची सत्यता तपासली आणि खात्री करुन झाल्यानंतर दागीने मुळ मालकास परत केले. या घटनेनंतर प्रामाणिकपणा दाखवत दागीने परत करणाऱ्या अनिल आहेर व निलेश परीट या दोघांचे कौतुक केले.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO