राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार

Ajit Pawar

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवारही महत्त्वाचा असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार न टाकल्यास चर्चा करू. उद्या विरोधी पक्षांसोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. महायुतीत आमदारंमध्ये कटुता न राहण्याचे प्रयत्न करू. सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊ, असे अजित पवार म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार यांनी पाऊस, राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या या गोष्टीचा ऊहापोह घेतला.  अजित पवार म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणाचं चक्र बदललं. पंतप्रधानांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहे. कोयना, उजनीमध्ये पाणी कमी आहे. आपल्याकडे पावसाची पाठ आहे. मात्र उत्तरेमध्ये मुसळधार बरसतो आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणाचं चक्र बदललंय. पुरेसा पाऊस नसल्याने चिंता वाढलीय. शेतकरी आणिजनतेच्या प्रश्नावर अधिक लक्ष देणार आहे. केंद्राचंही या प्रश्नावर लक्ष वेधणार आहे. १५ जुलै झाला तरी पुरेसा पाऊस नाही. केंद्र सरकारकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

अजित पवार पुढे म्हणाले- पीएम मोंदींसारखं दुसरं नेतृत्व नाही. शासन आपल्या दारी कल्याणकारी योजना आहे. पाठिंबा देणाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आहेत.

The post राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार appeared first on पुढारी.