
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून पुन्हा तयारी सुरू झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील तयारीच्या दृष्टीने मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांना दोन दिवसांच्या नाशिक दाैऱ्यावर पाठविले आहे. या दौऱ्यात ते नाशिक शहरासह जिल्ह्यातील मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकची जबाबदारी वर्षभरापूर्वीच अमित ठाकरे यांच्यावर सोपविली आहे. यामुळे या वर्षभरात जवळपास पाच ते सहा वेळा अमित ठाकरे यांनी नाशिकला हजेरी लावून मनसैनिकांशी चर्चा करण्याबरोबरच विद्यार्थी सेनेचे संघटन बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. २०२१ मध्ये राज यांनी नाशिकमध्ये लक्ष घालत बांधणी केली. ३१ प्रभागात नवीन नियुक्ती करून शाखाप्रमुखांना कार्यक्रम दिले होते. मात्र, त्यानंतर राज यांचे आजारपण व अन्य कारणामुळे ते नाशिकला वेळ देऊ शकले नाहीत. आता मनपा निवडणुका लागण्याची शक्यता गृहीत धरूनच अमित यांचे पुन्हा एकदा नाशिकडे लक्ष लागले आहे.
प्रभागासाठी १५ मिनिटांचा वेळ
अमित ठाकरे हे मंगळवारी (दि.२८) राजगड कार्यालयात तळ ठोकून असतील. या वेळेत ते प्रभागनिहाय मुख्य संघटना, विद्यार्थी संघटना, महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसाेबत तसेच स्थानिक पातळीवर सक्रिय असणाऱ्या मनसैनिकांशी संवाद साधतील. त्यासाठी ते प्रभागनिहाय १५ ते २० मिनिटांचा वेळ देणार आहेत. बुधवारी (दि.१) देखील ते मनसैनिकांशी संवाद साधून दुपारनंतर मुंबईला प्रायण करतील.
हेही वाचा :
- सांगली : 184 गावांत, 861 वाड्यांवर टंचाईचे सावट
- IND vs AUS : होळकर मैदानावर टीम इंडियाचे वर्चस्व
- नाशिक : कापडणीस खून खटल्यास मार्चमध्ये होणार सुरुवात, ॲड. उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद
The post 'राजपुत्र' अमित ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दाैऱ्यावर appeared first on पुढारी.