राजस्थानमधून महाराष्ट्रात पोहचवायचे होते घबाड; पोलिसांची कारवाई अन् फिस्कटला प्लॅन

नाशिक : राज्यात बंदी असूनही त्यांच काम सुरुच. थोडेथिडके नव्हे तब्बल दीड कोटींचे घबाड राजस्थानहून महाराष्ट्रात आणले. मात्र पोलिसांना खबर मिळताच फिस्कटला प्लॅन. करंजखेड फाटा परिसरात कंटनेर (आरजे ३०, जीए ३९१४) आणि (आरजे ३०, जीए ३८२४) हे दोन कंटनेर अडवून त्यांची तपासणी केली असता धक्काच. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

राजस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या दोन कंटेनरसह सुमारे एक कोटी ६४ लाख ३४ हजार ७३० रुपयांच्या गुटख्यासह सुगंधी तंबाखूचा साठा ग्रामीण पोलिसांनी नाशिक- सापुतारा मार्गावर जप्त केला. या प्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू गुजरात राज्यातून येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून ग्रामीण पोलिसांनी वणी पोलिसांच्या हद्दीत नाशिक- सापुतारा मार्गावर सापळा रचला. करंजखेड फाटा परिसरात कंटनेर (आरजे ३०, जीए ३९१४) आणि (आरजे ३०, जीए ३८२४) हे दोन कंटनेर अडवून त्यांची तपासणी केली असता, त्यात मिराज कंपनीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा सुमारे एक कोटी २४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा साठा मिळाला. पोलिसांनी दोन्ही कंटनेरचालक व क्लीनर महेंद्रसिंग सोलंकी (वय ३८, रा. उदयपूर, राजस्थान), श्‍यामसिंग राव (४४, बिदसर, चितोडगड, राजस्थान), अर्जुनसिंग राणावत (५६, चितोडगड), लोगलजी मेहवाल (४८, उदयपूर, राजस्थान) यांना अटक केली. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

एक कोटी ६४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दोन कंटेनरसह तंबाखू साठ्यासह एक कोटी ६४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल व चार संशयितांना अटक केली आहे. अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक सोमनाथ तांबे, वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात गुटख्याला बंदी असली तरी इतर राज्यात बंदी नसल्याने खुलेआम विक्री होते. महाराष्ट्रात येणारा गुटखा पोलिसांकडून पकडला जातो. पकडल्यानंतर संशयित माल महाराष्ट्रात नव्हे, तर बंदी नसलेल्या इतर राज्यांत पाठविण्यासाठी असल्याचे सांगतात. त्यामुळे गुटखाबंदी परिणामकारक ठरत नाही.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच