राजस्थानमध्ये कार अपघातात जळगावच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

कार अपघातात ६ जणांचा मृत्‍यू

जळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा दिवाळीची सुट्टी असल्याने राजस्थानात फिरायला गेलेल्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षकाच्या कुटुबाच्या कारला ट्रकची समरासमोर अपघात झाला. यामध्ये शिक्षक कुटुंबासह 6 जण आघातात ठार झाले आहे.

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे व योगेश धोंडू साळुंखे व दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब अशा दोन गाड्यातून राजस्थान फिरण्यासाठी लक्ष्मीपूजन आटपून निघाले होते.

राजस्थान मधील बाडमेर जैसलमेर राष्ट्रीय महामार्गावर जैसलमेर कडून जात असताना (सोमवार) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास सुरतेची बेरीज जवळ ट्रक व त्‍यांच्या कारची समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात सहाजण ठार झाले आहे. धनराज नागराज सोनवणे (वय 55), सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), स्वरांजली धनराज सोनवणे (वय 4), गायत्री योगेश साळुंखे (वय 30), भाग्यश्री योगेश साळुंखे (वय 01), प्रशांत योगेश साळुंखे (वय 07) हे जागीच ठार झाले आहेत.

अपघात होण्यापूर्वी धनराज सोनवणे हे जे वाहन चालवत होते त्या वाहनांमध्ये योगेश साळुंखे हे त्याच्या कुटुंबासह बसलेले होते. मात्र दुसऱ्या गाडीतील दिनेश सूर्यवंशी यांनी त्यांना फोन करून वाहन चालवण्यासाठी बोलवले होते. त्यामुळे ते अपघातात सुदैवाने वाचले, मात्र या अपघातात पत्नी मुलगा मुलगी हे ठार झाले.

The post राजस्थानमध्ये कार अपघातात जळगावच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.