जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या एका विवादित वक्त्यव्याच्या विरोधात एमआयएम पक्षाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीने संयुक्त राजीनामा दिला आहे. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. खालिद परवेज यांना जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला, अशी माहिती एमआयएम पक्षाचे माजी शहर व जिल्हाध्यक्ष अहमद काजी यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. खासदार इम्तियाज जलील यांना याप्रकरणी आम्ही संपर्क केला होता. परंतु पक्षातर्फे मुफ्ती इस्माईलवर कारवाई झाली नाही म्हणून आम्ही इस्माईल यांच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे असे काजी यांनी सांगितले.
काजी यांच्या मार्गदर्शनात पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. खालिद परवेज यांना देण्यात आलेल्या संयुक्त राजीनाम्यात जिल्हा उपाध्यक्ष इलियास शाह, जिल्हा सार्सजितनीस बाळा जगताप, कोषाध्यक्ष जावेद पंजाबी, शहर व जिल्हा प्रवक्ते दिलीप दीक्षित, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल साळवे, मुश्ताक कुरेशी, महासचिव अकबर शेख, सचिन गायकवाड, डॉ. मुजफ्फर कुरेशी आदींसह विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
हेही वाचा: