राज्यपालांच्या वक्तव्याचे धुळ्यात तीव्र पडसाद, ‘फोटोला जोडेमारो’

राज्यपाल वक्तव्य निषेध धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता हिमांशू त्रिवेदी यांनी महाराजांचा अवमान कारक उल्लेख केल्याचा आरोप करून आज सकल मराठा समाजाने राज्यपाल तसेच त्रिवेदी यांची प्रतिमा असणा-या बॅनरला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. या संदर्भात भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते हिमांशू त्रिवेदी यांनी वापरलेल्या वाक्याचे आज तीव्र पडसाद उमटले. मराठा समाजाच्या वतीने निलेश काटे, निंबा मराठे, जगन ताकटे, राजू ढवळे, आबा कदम यांच्यासह अनेकांनी यावेळी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. राज्यपाल आणि त्रिवेदी यांची प्रतिमा असणारा बॅनरच यावेळी जाळण्यात आला. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना निलेश काटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर राजकारणासाठी करू नये असा इशारा दिला. या दोन्ही नेत्यांवर आता भारतीय जनता पार्टी काय कारवाई करते याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष लागून असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

The post राज्यपालांच्या वक्तव्याचे धुळ्यात तीव्र पडसाद, 'फोटोला जोडेमारो' appeared first on पुढारी.