राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही : मुख्यमंत्री शिंदे

Eknathe Shinde

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना म्हणून राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. राज्यपालांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसांच्या मेहनतीवर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. ते त्यांचे वैयक्तिक विचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मालेगाव नाशिक येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज नाशिकमध्ये सर्व विभागांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी कृषि विद्यापीठ सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. लोकांचे प्रलंबीत प्रश्न व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मालेगाव जिल्हा निर्मितीची मागणी ही जुनी असुन अनेक नेत्यांनी मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, ते त्यांचे वैयक्तीक विचार आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. कोणाचाही अपमान होऊ नये यासाठी राज्यपालांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसांच्या मेहनतीवर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मराठी माणसांनी मुंबईसाठी हौतात्म पत्करले आहे. मराठी माणूस सोडून कोणालाही श्रेय घेता येणार नाही. कितीही संकटे आली तरी मुंबई थांबत नाही. मुंबईसाठी मराठी माणसाचं मोठं योगदान असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

The post राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही : मुख्यमंत्री शिंदे appeared first on पुढारी.