राज्यपाल येता घरी रानभाज्यांची असणार खास मेजवानी! सुरगाणाकरांना प्रतीक्षा फेब्रुवारीची

सुरगाणा (नाशिक) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रथमच सुरगाणा तालुक्यात ३ फेब्रुवारीला येत आहेत. दौऱ्यासंदर्भात तालुका प्रशासनाला निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी पत्र पाठविले आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे तयारी सुरू असून, भोरमाळ, सुरगाणा येथे हेलिपॅडची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुधीर पवार, नायब तहसीलदार सुरेश बकरे, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. 

 

या दौऱ्यात बागलाण तालुक्याचा समावेश आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस एन. डी. गावित, नगराध्यक्ष सुनील मोरे (सटाणा) यांना सूचित करण्यात आले आहे. गावित यांनी सांगितले, की ३ फेब्रुवारीला सकाळी नऊला राजभवनातून भोरमाळ (ता. बागलाण) येथे १०.४५ ला आगमन. तेथून ११ ला भिंतघर (गुलाबी) गाव येथे कारने ११.२० ला प्रयाण, तेथे काळू धर्मा जाधव स्मरणार्थ सुरू असलेल्या गोविज्ञान अनुसंधान केंद्राला भेट व बचतगटांच्या रोजगाराच्या संधी, लघु कृषी कुटीर उद्योग निर्मितील गोमूत्रापासून विविध उत्पादनांची पाहणी करतील. तसेच आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होईल. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

आदिवासी खाद्य संस्कृती रानभाज्यांची दिली जाणार मेजवानी 

आदिवासी पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात येईल. तेथूनच एक तासाने भोरमाळ येथे परत येथील आदिवासी खाद्य संस्कृतीचे नागलीची भाकरी, उडिदाची डाळ, भुजा, आळूचे, वराचे कंदभाजी, लसणाचे मीठ, अशा रानभाजी भोजनाची व्यवस्था महिला बचतगटामार्फत करण्यात आली आहे. भोरमाळ येथे काजू बी प्रक्रिया उद्योगाचे उद्‌घाटन करून सटाण्याकडे हेलिकॉप्टरने प्रयाण होईल, असे गावित यांनी सांगितले.  

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना