राज्यमंत्री बच्चू कडू पाहणीसाठी नाशिकच्या सिंचन भवनात, संशयास्पद कारभारामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई
<p>नाशिक जलसंपदा विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश जलसंपदा, लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेत. नाशिकच्या सिंचन भवनात बच्चू कडू यांनी अचानक हजेरील लावली. यावेळी सिंचन भवनातील कामांची कडू यांनी झाडाझडती घेतली. यावेळी सिंचन भवनातील अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आलं. तसंच अनेक कामं प्रलंबित असल्याची माहितीही समोर झालीय. पाच दिवसांचा आठवडा असूनही सरकारी अधिकारी कामात टाळाटाळ करत असल्याने बच्चू कडू संतप्त झाले. अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्या कामावरही कडू यांनी नाराजी व्यक्त केली. आठ दिवसांत कामात सुधारणा करण्याचे निर्देश कडू यांनी दिलेत. </p>