राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत?; संजय राऊतांचा शिंदेंना टोला

sanjay raut

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सेनेचं हायकमांड दिल्लीत आहे, मुंबईत नाही. म्हणूनचं मुख्यमंत्री मुंबई सोडून दिल्लीत गेले आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत.

राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी किती दिवस लागणार? बंडखोरांचे मुखवटे आता गळून पडताहेत. राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी दिल्लीत सेनेचं हायकमांड दिल्लीत आहे, मुंबईत नाही. मुंबईचे तुकडे पाडण्याचं षड्यंत्र सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (शुक्रवार) रात्री १० वाजण्याच्या सुमारास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शुक्रवारपासून शनिवार दुपारपर्यंत दिल्ली दौऱ्यावर आहेत.

 

The post राज्याचं मंत्रीमंडळ ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत?; संजय राऊतांचा शिंदेंना टोला appeared first on पुढारी.