राज्यातील २० टक्के अनुदान मंजूर शाळांना आता ४० टक्के; अखेर निधी वितरणाचा निर्णय पारीत

नाशिक  : राज्यात आज २० टक्के व २० टक्के घेत असलेल्या शाळांना पुढील ४० टक्के टप्प्याचा निधी वितारणाचा शासन निर्णय पारित झाला आहे. त्यासदर्भात बुधवारी (ता. १७) रात्री उशिरा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अघोषित, घोषित अंशतःअनुदानित शाळांचा प्रश्न मिटावा, यासाठी मुंबई स्थित आझाद मैदान येथे अघोषित शाळा घोषित व्हाव्यात. २० टक्के ४० टक्के अनुदान मंजूर होऊन निधी वितरणाचा जीआर पारित करावा. प्रचलित अनुदानाचे सुत्रा आणावे, इतर मागण्यांसाठी ४७ दिवसापासून आंदोलन सुरू होते.आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच आ. डॉ. सुधीर तांबे मंत्रालयामध्ये ठाण मांडून होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सातत्याने भेटून प्रश्न किती गंभीर आहे, महत्त्वाचा आहे हा सोडवलाच पाहिजे. ६६ हजार शिक्षकांच्या पोटापाण्याचा हा प्रश्न आहे. अभ्यास पूर्ण प्रश्नाची मांडणी केल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आली परंतु निधी वितरणाचा शासन निर्णय काढण्यात आलेला नव्हता.

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

अधिवेशन संपल्यानंतर देखील आ.डॉ. तांबे यांनी शालेय शिक्षण विभाग व वित्त विभागाचे अधिकारी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून आज २० टक्के व २० टक्के घेत असलेल्या शाळांना पुढील ४० टक्केचा टप्प्याचा निधी वितारणाचा शासन निर्णय पारित झाला. याबद्दल आ. डॉ. तांबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आभार मानले. तसेच यासाठी राज्यातील शिक्षक समन्वय संघ व सर्व विनाअनुदानित शिक्षक संघटना यांनी घेतलेली मेहनत व सातत्याने केलेला पाठपुरावा यांचे देखील आभार मानले. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

आपले काम अजून पूर्ण झालेले नाही अजून अघोषित शाळांचा प्रश्न आहे. तसेच पायाभूत वाढीव पदांचा प्रश्न आहे, त्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे व ते प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहील, असे आश्वासन दिले. 
- आमदार डॉ. सुधीर तांबे.