राज्यातील ५७ शासकीय आश्रमशाळा ‘मॉडेल शाळा’; विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण

नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने राज्यातील १०० शासकीय आश्रमशाळा ‘मॉडेल शाळा’ म्हणून तयार करण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील ५७ आश्रमशाळांचे रूपांतर मॉडेल स्कूल शाळांमध्ये करण्यात आले आहे. 

देशातील आदिवासी क्षेत्रातील मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून देशात सहा हजार मॉडेल शाळा माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुरू केल्या होत्या. राज्यात २०१६ मध्ये ४६ मॉडेल स्कूल सुरू झाले होते. मात्र ते काही कारणास्तव बंद पडले होते. परंतु आता परत राज्यात मॉडेल शाळा ही संकल्पना राबविली गेली असून, राज्यातील १०० शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर मॉडेल शाळांमध्ये केले जात असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे. 
ज्या शाळांमध्ये पायभूत सुविधा अद्ययावत असतील. अशाच आश्रमशाळांचे रूपांतर मॉडेल शाळेत केले जाणार आहे. त्यावर कार्यवाही सुरू झाली असून, राज्यातील चारही अपर आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रकल्प कार्यालयातील ५७ आश्रमशाळांचे रूपांतर मॉडेल शाळेत करण्यात आले आहे. यामध्ये पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यामातून शिक्षण दिले जात आहे. राज्यात सद्यःस्थितीत आदिवासी विकास विभागातर्फे ४९८ शासकीय आश्रमशाळा असून, यात सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी १०० अद्ययावत शासकीय आश्रमशाळा मॉडेल स्कूलमध्ये होणार आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

विभाग, प्रकल्प, शाळा संख्या (कंसात) 

नाशिक : नाशिक (५), कळवण (३), धुळे (५), नंदुरबार, तळोदा (प्रत्येकी १), राजूर (४) 

ठाणे : शहापूर (२), पेण, जव्हार, डहाणू (प्रत्येकी १ ) 
अमरावती : धारणी (३), अकोला, कळमनुरी (प्रत्येकी १), पांढरकवडा, किनवट (प्रत्येकी २), औरंगाबाद, पुसद (प्रत्येकी २). 

नागपूर : नागपूर (१), देवरी (४), चंद्रपूर (२), चिमुरा (१) गडचिरोली (५), अहेरी (१), भामरागड (४).  

 
हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती