राज्यातील 125 कृषी उपसंचालक सामूहिक रजेवर

कृषी विभाग www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पदोन्नतीची फाइल अडकवल्याच्या कारणास्तव राज्यातील 125 कृषी उपसंचालकांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील कृषी महोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी सोमवारपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या कृषी विभागाने 30 डिसेंबर रोजी केवळ दोन कृषी उपसंचालकांना सेवानिवृत्तीच्या एक दिवसापूर्वी पदोन्नती देऊन चेष्टा केली. त्याचा कृषी सेवा वर्ग 1 अधिकारी संघटनेने निषेध केला आहे. पदोन्नतीस पात्र इतर कृषी उपसंचालकांना 31 डिसेंबरपर्यंत पदोन्नतीचे आदेश कृषी विभागाने दिले नसल्याने राज्यातील कृषी उपसंचालक संतप्त झालेले आहेत. कृषी उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गात पदोन्नतीचे आदेश 31 डिसेंबरपर्यंत मिळण्याची मागणी कृषी सेवा वर्ग 1 अधिकारी कल्याणकारी संघटनेने कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडे 12 डिसेंबर रोजी केली होती. ज्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झालेली आहे, त्या अधिकाऱ्यांच्या नावाचाही पदोन्नतीच्या यादीत समावेश करण्यात यावा. महसूल विभागाचा विकल्प देणाऱ्या व सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या अधिकाऱ्याला महसूल विभागात पदोन्नती देण्यात यावी, यासह इतर मागण्या कृषी सेवा वर्ग 1 अधिकारी संघटनेने केलेल्या होत्या.

चार वर्षांपासून पदोन्नती रखडली
कृषी सेवा वर्गचे अधिकारी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष आरिफ शाह म्हणोल की, कृषी विभागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गातील 84 पदे रिक्त आहेत. 60 टक्के पदांचा अतिरिक्त पदभार आहे. राज्यातील कृषी उपसंचालकांची पदोन्नती चार वर्षांपूर्वीच होणे आवश्यक होते. विलंब होत असल्याचे 31 डिसेंबरपर्यंत पदोन्नती न झाल्यास सामूहिक रजेवर जाण्याचा प्रधान सचिवांना इशारा दिला होता. त्यामुळे 125 कृषी उपसंचालक सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा:

The post राज्यातील 125 कृषी उपसंचालक सामूहिक रजेवर appeared first on पुढारी.