
नाशिक : गौरव अहिरे
राज्यातील कारागृहांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले, न्यायाधीन बंदी व स्थानबद्ध किंवा इतर कैद्यांना ठेवण्यात येते. त्यानुसार राज्यातील सहा हजार 14 सिद्धदोष बंद्यांपैकी नाशिक मध्यवर्ती कारागृहात सर्वाधिक एक हजार 354 सिद्धदोष बंदी ठेवण्यात आले आहेत. त्यात एक हजार 315 पुरुष, 37 महिला व दोन तृतीयपंथी सिद्धदोष बंद्यांचा म्हणजेच शिक्षा लागलेल्या कैद्यांचा समावेश आहे.
राज्यात मध्यवर्ती, जिल्हा, विशेष, महिला, खुले, किशोर सुधारालय मिळून 60 कारागृह असून, त्यात 24 हजार 722 कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात जुलै 2022 अखेरपर्यंत या कारागृहांमध्ये 42 हजार 859 कैदी बंद आहेत. त्यात 20 टक्के म्हणजे आठ हजार 449 कैद्यांना शिक्षा सुनावण्यात आली असून, 34 हजार 184 कैदी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर 226 कैदी स्थानबद्ध किंवा इतर कारणांनी बंद आहेत. राज्यातील बहुसंख्य कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षा लागलेल्यांपैकी सर्वाधिक कैदी नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असताना, नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मात्र तीन हजार 208 कैद्यांची क्षमता असताना, तीन हजार 17 कैदी ठेवण्यात आले आहेत.
कारागृहनिहाय बंदिस्त कैदी (कंसात नाशिकमधील कैदी)
कारागृह प्रकार सिद्धदोष बंदी न्यायाधीन बंदी स्थानबद्ध/इतर
मध्यवर्ती 6,014 22,999 204
(1,354) (1,616) (47)
जिल्हा ४८७ १०,६४४ २२
विशेष ११ १८६ ००
महिला १५ ३५५ ००
किशोर सुधारालय ०७ ०० ००
खुले कारागृह १,६६५ ०० ००
इतर कारागृह १६ ०० ००
The post राज्यात सर्वाधिक सिद्धदोष बंदीवान नाशिक कारागृहात appeared first on पुढारी.