राज्य राखीव दलातील पोलिसालाच चोरट्यांनी लुटले; गुन्हा दाखल 

येवला (जि.नाशिक) : राज्य राखीव दलातील पोलिस शिपायास चोरट्यांनी लुटत त्यांची दुचाकी घेऊन फरारी झाले. काय घडले नेमके वाचा..

राज्य राखीव दलातील पोलिसालाच चोरट्यांनी लुटले

राज्य राखीव कोल्हापूर गट क्रमांक १६ मध्ये कार्यरत तालुक्यातील रामदास दशरथ साबळे आणि त्यांच्या पत्नी कोल्हापूर येथून दिवाळीच्या सुटीवर येण्यासाठी आपल्या सीडी डिलक्स दुचाकीने (एमएच ०९, सीपी ७१६५) कोपरगावच्या बाजूने येवल्याकडे येत होते. त्या वेळी मागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी साबळे यांच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर लाकडी दांडक्याने मारहाण करत साबळे यांच्या ताब्यातील ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी, कपड्यांची बॅग व इतर ऐवज चोरून नेला. साबळे यांनी येवला शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात