नाशिक : ऑनलाइन डेस्क
मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला असून मराठा समाजाला (Maratha aarakshan) कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी (OBC) किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून नाही तर स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल मंगळवार, दि. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात (Vishesh Adhiveshan) मांडला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
या निर्णयाबाबत अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रीया देताना सांगितले की, ओबीसीमध्ये केलेली घुसखोरी नकाेच. खोटी प्रमाणपत्र घेतलेल्यांनी तिथे गेलेलं बरं. सरकारनं कुणबीकरण थांबवावं तसेच कायदा, बिल, याबाबत जरांगे यांना किती समजतं माहित नाही.
The post राज्य सरकारचा मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय appeared first on पुढारी.