राज ठाकरेंचा नाशिक दौरा : मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट चोरणारा ‘चोर’ पोलीसांच्या ताब्यात; पाहा VIDEO

नाशिक :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज (ता.५) तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये आगमन झाले आहे. यावेळी विना मास्कचं राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेल एक्स्प्रेस इनच्या परिसरात एकच गर्दी केली होती. या दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट चोरताना एका चोराला पोलीसांनी पकडले. 

राज ठाकरेंचा नाशिक दौरा :  पाकीटचोर ताब्यात

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठी तयारी सुरु केली आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी राज ठाकरे फक्त निवडक पदाधिकाऱ्यांशीच चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे नाशिकमध्ये एका विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांचा हा विवाहसोहळा आहे.

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

चोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाल्यावर त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. या दरम्यान हॉटेल येथे राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट चोरणाऱ्या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

माजी महापौर मास्क काढण्याचा इशारा

यावेळी विना मास्कचं राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. तसेच राज ठाकरे यांनी "मास्क काढ" असा इशारा यांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांना यावेळी केला.  हॉटेल एक्स्प्रेस इन येथे राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांचे पाकीट सोडणाऱ्या चोराला पोलिसांनी घेतले ताब्यात