राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शिर्डीसह सप्तशृंगी देवीचे घेणार दर्शन

राज ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर शनिवारपासून (दि.१) येत आहेत. या दौऱ्यात ते शिर्डी तसेच सप्तगृंगी गड येथे कुटूंबियांसह दर्शनासाठी जाणार आहेत.

शनिवारी (दि.१) सकाळी विमानाने त्यांचे शिर्डी विमानतळावर आगमन हाेईल. साईबाबांचे दर्शन करून ते विमानाने ओझर विमानतळावर येतील. तेथून वाहनाव्दारे त्यांचे नाशिक येथे आगमन होईल. यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२) ते वाहनाने सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणार आहेत. दर्शनानंतर ते ओझर येथून मुंबईला प्रस्थान करणार आहेत. दरम्यान, शिर्डी येथे नाशिक येथून मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जाणार आहेत.

हेही वाचा :

The post राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शिर्डीसह सप्तशृंगी देवीचे घेणार दर्शन appeared first on पुढारी.