राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर! महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत घडामोडींना वेग

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एका विवाह समारंभाला नाशिकमध्ये येत असून, दौऱ्यानिमित्त मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याने पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे. 

नाशिककडे दुर्लक्ष केल्याने पक्षात शिथिलता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता गेल्यानंतर राज ठाकरे यांचे नाशिकमधील दौरे कमी झाले आहेत. गेल्या दीड वर्षात राज ठाकरे यांनी नाशिककडे दुर्लक्ष केल्याने पक्षात शिथिलता आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मनसेच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते राज ठाकरे यांना भेटले. त्या वेळी पक्षांतर्गत घडामोडींचा आढावा सादर केला होता. शहरात चांगले वातावरण असूनही नेते बाहेर पडत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडल्याची मुख्य तक्रार केली होती. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याचे आश्‍वासन दिले होते.

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

पक्षांतर्गत घडामोडींना वेग

मात्र, जानेवारीपाठोपाठ फेब्रुवारी महिनाही गेल्याने कार्यकर्ते राज ठाकरे कधी येतील, याची वाट पाहत होते. जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, मनविसे जिल्हाध्यक्ष श्‍याम गोहाड यांनी सोमवारी ठाकरे यांची भेट घेऊन नाशिकला येण्याची गळ घातली. गुरुवारी खासदार उदयनराजे यांच्या नातेवाइकांचा विवाह समारंभ असल्याने विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासह मनसे पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत.  

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना