राज ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर स्वागत

राज ठाकरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे दोन दिवसीय खासगी नाशिक दौऱ्यावर शनिवारी (दि.१) सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाले. साईबाबांच्या दर्शनानंतर ओझर विमानतळावर आगमन झालेल्या राज ठाकरे यांचे मनसे पदाधिकाऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत करताना शहराध्यक्ष दिलीप दातीर व ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख.

शनिवारी (दि.१) सकाळी ९.३० वाजता शिर्डी साईबाबा समाधी मंदिरात दर्शन करून राज ठाकरे यांचे विमानाने ओझर येथे आगमन झाले. त्यांच्या सोबत शर्मिला ठाकरे, मनसे नेते बाळासाहेब नांदगांवकर, महिला सेनेच्या अध्यक्षा रिटा गुप्ता, हर्शल देशपांडे, मनोज हाटे, सचिन मोरे आदी सहकारी उपस्थित होते.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख, प्रवक्ते पराग शिंत्रे, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, सत्यम खंडाळे, विक्रम कदम, नितीन माळी, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, नामदेव पाटील, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, कामगार सेनेचे चिटणीस प्रकाश कोरडे, उपशहराध्यक्ष अक्षय खांडरे तसेच कामिनी दोंदे व पद्मिनी वारे, शहराध्यक्षा अर्चना जाधव व अरुणा पाटील आदी उपस्थित हाेते.

हेही वाचा :

The post राज ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर स्वागत appeared first on पुढारी.