राज ठाकरे व फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरने! मनसे-भाजप एकत्र येण्याची शक्यता?

नाशिक : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नातेवाइकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (ता. ५) मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज येणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये येत असल्याने मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे व फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरने येणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

महापालिकेत भाजपला मनसेची साथ

आगामी महापालिका निवडणुकीत मनसे व भाजप एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेत भाजपला मनसेची साथ मिळाली आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला खुले समर्थन दिल्याने युती अधिक घट्ट झाली आहे. त्याशिवाय मनसेंतर्गत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याने राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा