राणेनगर उड्डाणपूल बोगद्यात कायमचीच वाहतूक कोंडी ; विद्यार्थ्यांची तारांबळ, समांतर पूल उभारण्याची मागणी

राणेनगर बोगदा

सिडको : पुढारी वृत्तसेवा– राणेनगर येथील उडाणपुलाखालील बोगद्यात होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली असल्याने वाहनचालक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली यात शुक्रवारी सकाळी इयत्ता १० वी चा पेपर असल्याने विद्यार्थी व पालक यांची तारांबळ उडाली. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिस गायब होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप करीत, या ठिकाणी समांतर पूल उभारावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

सिडको व इंदिरानगरला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे राणेनगर बोगदा, ज्यांना सिडकोकडे यायचे त्यांना व ज्यांना सिडकोतून इंदिरानगर किंवा पुढे जायचे त्यांना याच बोगद्यातून जावे लागते. याच पुलाच्या खाली व बोगद्याच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड आहे. एकाच वेळी सर्व्हिस रोड व समोरून जाणारी वाहने, अशी चार ठिकाणची वाहने समोरासमोर येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी कोणतेही नियोजन केलेले नाही. एकतर महामार्गावर उड्डानपूल उभारताना नियोजन नसल्याने पूल अरुंद झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वर्षभरापूर्वी राष्ट्रीय प्राधिकरणाने वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता दोन्ही बाजूंना रॅम करण्यात आले आहे. तरीही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नाही. पोलिस काही कामानिमित वेधून बाजूला जाताच पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. परिणामी वाहन चालकांमध्ये हाणामारीचे प्रकार घडतात .

सकाळ व संध्याकाळीच वाहतूक कोंडी

राणेनगर बोगद्यात सर्वाधिक वाहतूक कोंडी सकाळी ८ ते ११ नंतर सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत होते. गंगापूर रोड, सातपूर या भागांतील कार्यालये सुटल्यानंतर या भागात तासाभरात हजारो वाहनांची वाहतूक होते. परंतु चिंचोळ्या बोगद्यातून कर्मचा-यांची वाहने, शाळेच्या रिक्षा-टेम्पो आणि बसेस यांच्यात स्पर्धा लागते. या ठिकाणी वायू प्रदूषणामुळे अक्षरशः जीव कोडला जातो.

परिक्षार्थी व पालकांची तारांबळ

शुक्रवारी सकाळी इयत्ता १० वी चा परीक्षेचा पेपर होता . शुक्रवारी सकाळी राणेनगर बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती . परिक्षार्थी व पालक हे वाहतुकीच्या कोंडीतून वाहने काढताना त्यांची तारांबळ उडाली .

राणेनगर बोगदा येथे सकाळी, दुपारी व सायंकाळी वाहतूक ठप्प होत असल्याने या ठिकाणी समांतर पूल उभारण्याचे काम सुरू केले पाहिजे तसेच बोगद्यात दिवसभर पोलिस नियुक्त केल्यास कोंडी तयार होणार नाही आणि महागड्या इंधनाचा खर्चही वाचेल, तर प्रशासनाने लक्ष घातले नाही तर आचार संहिता संपल्यानंतर नागरिकासमवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- मकरंद सोमवंशी, सामाजिक कार्यकर्त

हेही वाचा :

The post राणेनगर उड्डाणपूल बोगद्यात कायमचीच वाहतूक कोंडी ; विद्यार्थ्यांची तारांबळ, समांतर पूल उभारण्याची मागणी appeared first on पुढारी.