रात्रीचा थरार! बिबट्याच्या रुपात साक्षात मृत्यूच समोर उभा; युवा शेतकऱ्याची धाडसी झुंज

इगतपुरी (नाशिक) : रात्रीची वेळ...संकेत हा कांदा पिकाला पाणी भरत होता. कामाच्या नादात असतांना अचानक गुरगुरण्याचा आवाज आला. हातातली टॉर्च चमकवत मागे वळून बघितले तर पाया खालची जमिनीच सरकली. समोर होता बिबट्या. अन् नंतर घडले असे...

अशी आहे घटना

शुक्रवारी (ता. 26) रात्रीच्या वेळी अडसरे बुद्रुक येथील युवा शेतकरी संकेत साबळे हा शेतात अडसरे बुद्रुक येथील शेतकरी होता. कामात असतांना अचानक गुरगुरण्याचा आवाज झाला. संकेतने मागे वळून बघितले तर बिबट्या काही हालचाल करायच्या आधीच बिबट्याने हल्ला चढवला. या झटापटीत संकेतच्या पायाला व हाताला बिबट्याने ओरबाडत गंभीर जखमा केल्या. संकेतने मोठ्या चालाखीने बिबट्याशी झुंज देत असतांना बॅटरीच्या प्रकाशाचा आधार घेत बिबट्याच्या डोळ्यावर बॅटरी चमकवली. अन् मातीचा ढेकूळ बिबट्याच्या दिशेने भिरकावत बिबट्याला पळवून लावले. संकेत हा जखमी झाल्याने यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने एक शेळी फस्त केल्याची घटना घडल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >  दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

पिंजरा लावण्याच्या मागणी

तालुक्याच्या विविध भागात गेल्या महीनाभरापासुन बिबट्यांचा वावर वाढला असुन यातुन एका बिबटयाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तरी उर्वरीत बिबट्यांची दहशत कायम आहे. काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील अधरवड व पिंपळगाव मोर येथील दोन बालिकांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच पुन्हा एकदा राञीच्या सुमारास शेतात पाणी भरत असतांना अडसरे बुद्रुक येथील संकेत साबळे तरूण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. या ठिकाणी तत्काळ पिंजरा लावण्याबरोबरच दिवसाही वीज उपलब्ध करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार