रात्रीच्या पावसानं रेल्वेला ब्रेक! कसारा घाटात दरड कोसळली; दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

<p>मध्य रेल्वेवरील कसारा घाटात दरड कोसळली. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय. तर तिकडे इगतपुरी इथे अडकलेल्या प्रवाश्यांना कसारा आणि इतर ठिकाणी बसने नेण्यात येतंय. कसारा घाटात तीन ठिकाणी मोठे दगड पडलेत. कसारा घाटाप्रमाणेच स्थिती भोरघाट, लोणावळा-खंडाळा घाटात आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅकखालची माती, खडी वाहून गेल्यानं रेल्वे वाहतुकीला अडचण आलीय. कर्जत-कसारा भागात झालेला पाऊस आणि काही ठिकाणी रुळावर माती आल्यानं मुंबईकडे येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या नाशिक आणि इगतपुरीमध्येच थांबवण्यात आल्यात. कसारा घाटात रेल्वे रुळावर माती आल्यानं लांबपल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक ठप्प झालीय.</p>