रानवडचा शेतकरीपुत्र बनला लेफ्टनंट कर्नल! कुटुंबासह गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरला

निफाड (जि.नाशिक) : रानवडला शेती-मातीची नाळ सांगणाऱ्या शेतकरी कुटुंबातील लेकाचीच सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.. देशसेवेची ओढ असल्याने पुत्र सैन्यदलात दाखल झाल्याने कुटुंबासह गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरून आला आहे.

रानवडचा शेतकरीपुत्र बनला लेफ्टनंट कर्नल 

निफाड तालुक्यातील रानवड येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुभाष वाघ यांची सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती झाल्याने रानवड परिसरात आनंदाचे वातावरण आहे. रानवडला शेती-मातीची नाळ सांगणाऱ्या शेतकरी कुटुंबात सुभाष वाघ यांचा जन्म झाला. देशसेवेची ओढ असल्याने ते सैन्यदलात भरती झाले. त्यांची नुकतीच पदोन्नतीने लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती झाली.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

सुरतगड मिलिटरी स्टेशन विभागात कार्यरत

सेवा विभागाचे वरिष्ठ अधिकारी एस. एस. श्रीवास्तव यांच्या हस्ते त्यांना अधिकारपत्र प्रदान करण्यात आले. सध्या ते राजस्थानच्या सुरतगड मिलिटरी स्टेशन विभागात कार्यरत आहेत. कर्नल वाघ यांचे बंधू संजय व सुनीलही सैन्य दल तसेच नेव्ही विभागात उच्च पदावर कार्यरत होते. रानवड परिसरातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रभान वाघ यांचे ते पुत्र आहेत. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा