रामदास आठवले उद्या नाशिक दौऱ्यावर!

नाशिक : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले शुक्रवारी (ता. २२) नाशिक दौऱ्यावर येताहेत. त्यांच्या उपस्थितीत इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात कार्यक्रम होतील. सकाळी अकराला ते मानस हॉटेलमध्ये पोचतील आणि कार्यक्रमाला उपस्थित राहतील. 

इगतपुरी, सिन्नर तालुक्यात कार्यक्रम 

कुंभाळे (ता. सिन्नर) येथील विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण दुपारी बाराला आठवले यांच्या हस्ते होईल. दुपारी एकला नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील बुद्धविहाराचे उद्‍घाटन करतील. दुपारी अडीचला नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहात पोचतील. याच ठिकाणी दुपारी चारला त्यांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, नाशिक महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होईल. सायंकाळी साडेचारला पत्रकारांशी संवाद साधतील. सायंकाळी पाचला खुटवडनगरमधील सिद्धी बँक्वेट हॉलमधील कार्यक्रमात आठवले उपस्थित राहतील आणि सायंकाळी सहाला ते मुंबईकडे प्रयाण करतील.

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण