पिंपळगाव बसवंत(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- केंद्रीय मंत्रिपदाची हॅट्ट्रिक करणारे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे गुरुवारी (दि. 20) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यात ते निफाड तालुक्यात आकस्मिक निधन झालेले रिपाइं कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली.
निफाड तालुक्यातील ओझर येथील रहिवासी व रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव, तालुकाध्यक्ष महेंद्र साळवे, रिपाइं नेते सुनील कांबळे, इगतपुरी तालुक्यातील सरपंच मंगेश रोकडे यांचे निधन झाले असून, यांच्या घरी मंत्री आठवले सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर मंत्रिपदाची हॅट्ट्रिक केल्याबद्दल नाशिक येथे कालिदास कला मंदिरात त्यांचा नागरी सत्कार होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा भुसे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, गिरीश महाजन तसेच महायुतीचे आमदार उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामीण जिल्हा संघटक भारत गांगुर्डे यांनी केले आहे.
हेही वाचा –